व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; निगडे, कल्हाटसह पाच गावातील नागरिकांना दिलासा

आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून निगडे इथे तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 30, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
nigde-maval-taluka

Photo Courtesy : Raju Doundkar


आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून निगडे इथे तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवार (दिनांक दिनांक 30 मे) करण्यात आला. या या कामासाठी एकूण 20 लक्ष 35 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या कार्यालयाच्या इमारतीच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी कार्यालय स्वतंत्र असणे गरजेचे होते. हीच गरज ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध केला.या कार्यालयामुळे नागरिकांसाठी तलाठी देखील वेळेवर उपलब्ध होतील.” – भिकाजी भागवत सरपंच निगडे.

ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांची कामे ही तलाठी कार्यालयाशी संबंधित असतात. तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत. तसेच विविध नोंदणी, दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. तलाठी कार्यालयाचे कामकाज अपुऱ्या जागेमध्ये करावे लागत होते. त्यामुळे निगडे, कल्हाट, कशाळ, भोयरे, पवळेवाडी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. निगडे गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थायिक स्वरुपात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. ( foundation laying of new building of talathi office at nigde maval taluka )

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बंडू घोजगे, निगडे उपसरपंच गणेश भांगरे, आंबळे सरपंच मोहन घोलप, माजी सरपंच बळीराम भोईरकर, विठ्ठल जाधव, देविदास भांगरे, सविता भांगरे, तलाठी जाधव, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, बाबाजी गायकवाड, दत्तात्रय पडवळ, चेअरमन संतोष करवंदे, माणिक तांबोळी, बाबाजी येवले, योगेश थरकुडे,सोपान ठाकर, सीताराम ठाकर,घमादादा ठाकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली, सुधारित आदेशात ‘या’ ठिकाणी पदस्थापना
– भोयरे गावातील अंतर्गत रस्ते विकास कामाला सुरुवात, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध


Previous Post

सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली, सुधारित आदेशात ‘या’ ठिकाणी पदस्थापना

Next Post

आंदर मावळातील खांडी गावात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कार्यक्रम; 85 महिला आणि मुलींचा समावेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
menstrual-hygiene-day

आंदर मावळातील खांडी गावात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कार्यक्रम; 85 महिला आणि मुलींचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.