व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मळवंडी ठुले गावात खरीप हंगाम सभा; कृषि विभागाकडून भातपीक आणि योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणेसंदर्भात मोहीम राबविली जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 31, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
kharif-season-guidance-meeting

Photo Courtesy : Vikas Gosavi


खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांच्या शेतावर मशागतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ भागात गावोगावी भात पिक पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणेसंदर्भात मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मळवंडी ठुले खरीप हंगाम मार्गदर्शन सभा घेण्यात आली. गावातील शेतकऱ्यांनी या सभेला चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना भातपिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषि अधिकारी दत्तात्रय गावडे व कृषि विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषि अधिकारी विकास गोसावी यांनी केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जे शेतकरी घरगुती भात बियाणे पेरणीसाठी वापरतात, त्यांनी मीठाच्या 3 टक्के द्रावणाची बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मिठाचा वापर करावा. यानंतर प्रथम शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करुन 3 ते 4 तासांनी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जीवाणू (पीएसबी) या जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी व नंतर अशा पध्दतीने संस्करण केलेले बियाणे हे गादीवाफा तयार करुन रोपवाटिकेवर पेरावे, असे आवाहन कृषी अधिकारी दत्तात्रय गावडे व कृषी सहायक विकास गोसावी यांनी केले आहे. ( kharif season guidance meeting for farmers in malvandi thule village by maval agriculture department )

मळवंडी ठुले येथील खरीप हंगाम सभेस उपसरपंच ज्ञानेश्वर तुकाराम ठुले, ग्रामपंचायत सदस्य वसंत ठुले, प्रगतशील शेतकरी किसन ठुले, ज्ञानेश्वर बेनगुडे, एकनाथ राक्षे, बबन पवार, शाबू ठुले, आबू ठुले, भगवान ठुले, प्रदीप देशपांडे, वसंत पवार, यशवंत बेनगुडे, ज्ञानेश्वर ठुले, अंकुश ठुले, बाळू पवार, बाबुराव उदेकर, अंनता बेनगुडे, संतोष ठुले, संजय आमले, गोरखनाथ शिंदे, रामदास ठुले भाऊ मोहोळ, बाळू पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषिसहायक विकास गोसावी व प्रदीप देशपांडे यांनी केले.

हेही वाचा – पवना धरणातील जलसाठ्यात मोठी घट! पावसाने दडी मारल्यास पाणीकपातीचे संकट, पाहा सध्याचा पाणी साठा

बीजप्रक्रियेचे फायदे – (कृषी सहाय्यक – विकास गोसावी)

  • जमिनीतुन व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो
  • बियाण्यांची उगवणक्षमता वाढते
  • रोपे तजेलदार व जोमदारपणे वाढतात
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते
  • बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो

“खरीप हंगाम मार्गदर्शन सभेचा आमच्या गावातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. आम्ही सगळे शेतकरी बीजप्रक्रिया, गादीवाफ्यावर रोपवाटिका, दोरीत लागवड, युरिया ब्रिकेट खताचा वापर करणार आहोत. कृषि विभाग शेतकऱ्यांसाठी कायमच कार्यरत आहे.” (प्रदीप देशपांडे – प्रगतशील शेतकरी, मळवंडी ठुले)

अधिक वाचा –
– ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ
– निगडे येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; निगडे, कल्हाटसह पाच गावातील नागरिकांना दिलासा


Previous Post

एक वर्षापूर्वी झालेल्या ‘त्या’ चोरीच्या गुन्ह्याचा वडगाव मावळ पोलिसांकडून छडा, मुद्देमालासह आरोपी गजाआड

Next Post

पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chandrakant-Patil

पावसाळ्यापूर्वी शाळा आणि अंगणवाड्यांची कामे त्वरित पूर्ण करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.