व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी, वाचा काय आहे प्रकरण । Pune District Collector Suhas Diwase

दिवसे यांच्या नियुक्ती विरोधात आम आदमी पार्टीची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे तक्रार

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2024
in ग्रामीण, पुणे, शहर
Suhas-Diwase

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर सुहास दिवसे यांची 7 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली आहे. त्याआधी मागील चार वर्षापासुन सुहास दिवसे पुण्यात महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत, त्याचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे दिवसे यांची बदली रद्द करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी आयोगाकडे केली आहे. दिवसे यांच्या बदली बरोबर इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीवर देखील कुंभार यांनी आक्षेप घेतला आहे आणि त्या विरोधात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सुहास दिवसे जुलै 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पीएमआरडीए चे आयुक्त होते त्यानंतर सप्टेंबर 2022 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात क्रीडा आयुक्त म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली होती,सात फेब्रुवारीला पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून दिवसे यांची नियुक्ती झाली. तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिला आहे. दिवसे यांच्या बदलीने या नियमाचा भंग झाला आहे. किंवा निवडणूक आयोगाचा नियम डावलून दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच दिवसे यांची जिल्हाधिकारी पदावर झाल्याने तेच जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. (AAP Requested Election Commission To Cancel Appointment Of Newly Appointed Pune District Collector Suhas Diwase)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलांचे काय निकष आयोगाने घालून दिले आहेत?
21 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलण्याचे निकष ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांची जिल्हा बाहेर बदली करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात झाला असेल मात्र संबंधित अधिकारी निवडणुकीची संबंधित काम करणार नसेल तर तो जिल्ह्यात राहू शकतो. मात्र भविष्यात अशा अधिकाऱ्याकडे निवडणुकीशी संबंधित काम देण्यात येऊ नये, अशी अट आयोगाने घातलेली आहे. याच अटीचे उल्लंघन दिवसे यांची बदली करताना झालेले आहे.

दिवसे जवळपास चार वर्ष पुण्यात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत आणि आता त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असणार आहे. तसेच दिवसेंना वेगळा न्याय कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय दिसून येतो. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार, प्रांत, अपर जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, डी.वाय.एस.पी. अशा अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या. निकषात बसत नसलेल्या मात्र तीन वर्षापेक्षा अधिक काळ जिल्ह्यात काम केलेल्या सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या सरसकट बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसेंना वेगळा न्याय आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेगळा न्याय अशी सरकारची भूमिका असल्याची टीका होतेय. म्हणूनच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School


dainik maval jahirat

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध! Maval News

Next Post

बंद म्हणजे बंद..! ‘शिरे-शेटेवाडी येथील दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करा, नाहीतर..’ ग्रामसभेत ठराव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
stone-quarry-and-stone-crusher

बंद म्हणजे बंद..! 'शिरे-शेटेवाडी येथील दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करा, नाहीतर..' ग्रामसभेत ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.