गुरुवार (दिनांक 22 सप्टेंबर) रोजी कोथुर्णे ग्रामपंचायतच्या ( Kothurne Gram Panchayat ) सरपंच पदाची ( Sarpanch ) निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अबोली अतुल सोनवणे ( Aboli Sonawane ) यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस अतुल बाजीराव सोनवणे यांच्या अबोली या पत्नी आहेत. ( Aboli Sonawane Elected Sarpanch Of Kothurne Gram Panchayat )
कोथुर्णे ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी गुरुवारी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी प्रकाश बलकवडे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक शशिकांत तिडके पाटील, गावकामगार तलाठी सुप्रिया कावरे यांनी सहकार्य केले.
हेही वाचा – साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ वर्णी, निवड बिनविरोध
सरपंच पदाच्या निवडीवेळी विहित वेळेत अबोली अतुल सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बलकवडे यांनी अबोली सोनवणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेवेळी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, कोथुर्णेचे मावळते सरपंच प्रमोद दळवी, माजी उपसरपंच सचिन दळवी, उपसरपंच रूपाली भीमराव दळवी, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी फाटक, जुईली दळवी, शकुंतला वाघमारे, एकनाथ दळवी, बाळ सोनवणे, सिधु दळवी, हिरामण नढे, सदाशिव सुतार, लक्ष्मण दळवी, बाळासाहेब मसुरकर, माऊली सोनवणे, शेखर दळवी, भीमराव दळवी, भाऊ सोनवणे, राहुल सोनवणे, संदीप दळवी, सुरेश दळवी, बाळू नढे, सिद्धू दळवी, हिरामण नढे, सूर्यकांत दळवी, नवनाथ दळवी, कैलास सोनवणे, गौतम सोनवणे, महेंद्र सोनवणे, नंदू सोनवणे, दत्तू सोनवणे, शरद सोनवणे, मोहन सोनवणे, गणेश गायकवाड, संदीप सोनवणे, सचिन सोनवणे आणि इतर मान्यवर मंडळी, कोथुर्णे ग्रामस्थ उपस्थित होते. ( Aboli Atul Sonawane Elected Unopposed Kothurne Gram Panchayat Sarpanch )
हेही वाचा – कोथुर्णेतील निर्भयाचा वाढदिवस; नराधम आरोपीला अजूनही फाशी नाहीच, राजकारण्यांची आश्वासने हवेत
अबोली सोनावणे यांची सरपंच पदी निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामदैवताची पूजा करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त सरपंच अबोली सोनवणे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणूकीत सहभागी झाले होते.
गावातील महिलांनी नवनियुक्त सरपंचांना ओवाळूण त्यांचे औक्षण केले. मिरवणूक कार्यक्रमानंतर नवनियुक्त सरपंचांचा भव्य नागरी सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही सन्मान सोहळा संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आरपीआय युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष समीर जाधव, महिला आघाडी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सदस्य यमुना साळवे, भावना ओव्हाळ, पुणे जिल्हा संघटक धर्मरक्षित जाधव माऊली सोनवणे, उषा जाधव, पवन मावळ अध्यक्ष दादासाहेब वाघमारे, प्रफुल्ल भालेसैन, अशोक गायकवाड, अशोक सरवते, संतोष कदम, अरविंद रोकडे तसेच मावळ तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ‘यांची’ वर्णी, निवड बिनविरोध
यावेळी समता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. भाऊ सोनवणे, संदीप सोनवणे, शरद सोनवणे, मोहन सोनवणे, गणेश गायकवाड, सचिन सोनवणे, महेंद्र सोनवणे, नंदू सोनवणे, बाळू सोनवणे, सुधीर सोनवणे, सोपान सोनवणे, प्रमुख सोनवणे, मिलिंद सोनवणे, सुमित सोनवणे, अविनाश गायकवाड, गणेश गायकवाड, संतोष सोनवणे, अशोक सोनवणे यांच्या हस्ते मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी तर प्रास्ताविक पुणे जिल्हा युवक आघाडी सरचिटणीस अतुल सोनवणे यांनी केले. आभार पवन मावळ युवक आघाडी संपर्कप्रमुख शरद सोनवणे यांनी मानले.
View this post on Instagram