भुशी धरणाच्या पाठीमागील धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर भुशी धरण परिसरातील अतिक्रमणांवर सुरू करण्यात आलेल्या धडक कारवाईला आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भुशी धरण परिसरात छोटे-मोठे व्यावसायिक व विक्रेते गेली कित्येक वर्षे व्यवसाय करत आहेत. त्यावर सुमारे पाचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. दुर्घटनेनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केल्यामुळे ही सर्व कुटुंबे रस्त्यावर आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली व कारवाईस थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ( Action against encroachment in Bhushi Dam area temporary adjournment due to MLA Sunil Shelke )
येत्या दोन दिवसांत आपण स्वतः प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत भुशी धरण परिसरात समक्ष पाहणी करणार आहोत. त्यानंतर संबंधित व्यावसायिक व विक्रेते यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आमदार शेळके यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब विक्रेत्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.
या भागातील छोटे-मोठे विक्रेते व त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही. आपण शेवटपर्यंत या व्यावसायिक व विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहू.लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याची भूमिका राहील. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन शेळके यांनी केले.
अधिक वाचा –
– राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर
– कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News
– कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय