मावळ तालुक्यातील जुना मुंबई पुणे हायवेवर असलेला सोमाटणे फाटा येथील टोलनाका कायमचा बंद करावा, यामागणीसाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या नेतृत्वात मंगळवारी सोमाटणे फाटा इथे अभूतपूर्व असे आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांची बाजू समजून घेण्यासाठी स्वतः राज्याचे कॅबिनेटमंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित झाले होते. रविंद्र चव्हाण यांनी आंदोलकांना शब्द दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ मधील आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. आंदोलकांची भावना समजावून घेतली. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आपण आलो आहोत, असे सांगताना त्यांनी लवकरच अधिवेशन संपताच याविषयी बैठव घेऊन योग्य तो तोडगा काढणार असे सांगितले. तसेच, तो पर्यंत मावळातील कोणत्याच नागरिकांनी टोल भरू नये असे आव्हान त्यांनी केले आणि तशा सूचना आयआरबी चे अधिकारी यांना दिल्या.
मंगळवारी आंदोलन करण्यासाठी रात्रातून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून अनेक सर्व सामान्य नागरिक जमले होते. त्यानंतर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवासी वाहतूक विनामूल्य सोडण्याचे आदेश आयआरबी आणि टोल प्रशासनाला दिलेत. तसेच साधारण 26 मार्चला अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सोमाटणे टोल हटाव कृती समिती बरोबर बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत सोमाटने टोल नाक्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्याकडून टोल न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला मावळ तालुक्यातील जखमी शिवभक्तांशी संवाद – पाहा व्हिडिओ
– शास्ती कर माफ करा, ग्रामपंचायत काळातील बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपाचे नगरपंचायत सीईओंना निवेदन