पुणे येथे 71व्या ऑल इंडिया पोलीस गेम्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी (महामार्ग पोलिस) यांनी 80 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल मिळवले, त्याच सोबत त्यांनी “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” हा भारतीय पोलीस दलामधील मानाचा किताब पटकावून सर्वोत्कृष्ट बॅाडी बिल्डर होण्याचा मानही मिळवला. पुजारी यांनी या कामगिरीसह देशभरात महाराष्ट्र राज्याची आणि अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलाची मान उंचावली आहे. ( All India Police Games 2022 Assistant Police Inspector Subhash Pujari Awarded By Champion of Champions Title )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ आणि कोअर जिम – खारघर या ठिकाणी सराव करत होते. या स्पर्धेसाठी 36 संघांनी आणि 2500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी त्यांना वर्ल्ड बॉडी बिल्डींगचे सेक्रेटरी चेतन पाठारे, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग लिगल अँडव्हायझर विक्रम रोठे, साऊथ एशिया बॉडी बिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे, रागिणी पुजारी, सुदर्शन खेडेकर – डोंबिवली, सागर ढमाले इत्यादींचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सुभाष पुजारी यांनी यापूर्वी जुलै 2022 मध्ये मालदीव येथे झालेलया मिस्टर एशिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. ताश्कंद-उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळवले होते. तसेच सलग दोनवेळा भारत श्री आणि महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. दरम्यान थायलंड पुकेट या ठिकाणी होणा-या “मिस्टर वर्ल्ड” स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरिश महाजन आदींची उपस्थिती होती. ( All India Police Games 2022 Assistant Police Inspector Subhash Pujari Awarded By Champion of Champions Title )
हेही वाचा – मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, सर्वत्र खळबळ
पोलिस महासंचालक रजनीश शेठ, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस आयुक्त नवी मुंबई – बिपिनकुमार सिंग, अप्पर पोलिस महासंचालक – विनय कारगांवकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य – अनुपकुमार सिंह, पोलिस महानिरिक्षक (प्रशासन ) – जय कुमार, अप्पर पोलीस आयुक्त नवी मुंबई – डॅा .जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त मुंबई शहर – दिलीप सावंत, ॲडिशनल पोलिस कमिशनर ठाणे शहर – संजय जाधव आदीसंह आमदार रोहित पवार, सभागृह नेता – पनवेल महापालिका – परेश ठाकूर, विरोधी – पक्षनेता पनवेल महापालिका प्रीतम म्हात्रे तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– व्हिडिओ: खोपोलीच्या दिवेश पालांडे आणि पायल मरागजे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट
– स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडा महोत्सव 2022 : बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश