वडगाव मावळ : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या रिक्त असलेल्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनिल मोहिते हे 3 मतांनी विजयी झाले. संचालक पद निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून सचिव गणपत भानुसघरे यांनी काम पाहिले. ( anil mohite won election for post of director of kanhe society with majority maval )
रिक्त संचालक पदाच्या जागेसाठी अनिल मोहिते यांच्यासह माणिक काकरे, दत्तात्रय निम्हण, बाळासाहेब मोहिते यांनी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेत अनिल मोहिते यांना 7 व माणिक काकरे यांना 4 मते मिळाली. तर, दत्तात्रय निम्हण व बाळासाहेब मोहिते यांना प्रत्येकी शुन्य मतदान झाले. त्यामुळे या निवडणूकीत अनिल मोहिते यांचा विजय झाला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन विलास जांभुळकर, व्हाईस चेअरमन प्रदीप ओव्हाळ, संचालक किशोर सातकर, एकनाथ येवले, दत्तात्रय शिंदे, सुदाम आगळमे, अशोक सातकर, बंडोबा सातकर, दशरथ सातकर, मंदा गाडे, नंदा सातकर आदीजण उपस्थितीत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार
– खाकीला डाग! 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा, महिलेची तक्रार
– वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती