भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये पुणे सातारा रा. म. क्र. 48 वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोडच्या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३० जूनपर्यंत काढून घ्यावीत. ही अतिक्रमण 7 दिवसात न काढल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कारवाई येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आपल्या होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट 2002 अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. व त्याचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल. ( Appeal to remove encroachment on Pune-Satara National Highway )
विहीत मुदतीनंतर होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी, असेही पुणे एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरूवात । Talegaon Dabhade
– लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी
– मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi