मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी हद्दीतील मौजे कातवी गावात असलेल्या एका बांधकाम साईटवर तब्बल 1 लाख 43 हजार रुपयाच्या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहन बसंत मालवाडकर (वय 51 वर्षे, व्यवसाय – बांधकाम, रा. घोरपडी पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 20 सप्टेंबर रात्री 9 ते दिनांक 21 सप्टेंबर सकाळी 10 च्या दरम्यान ही चोरी घडली. मौजे कातवी (ता. मावळ) येथील के. बी. डी. डेव्हलपर्स या बांधकाम साईटवर चोरी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीचे अंदाजे 4780 किलो असे एकूण किंमत 1,43,400 रुपयांचे लोखंडी सेट्रींग मटेरियलचा माल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोउपनी आहिरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( As much as 1 lakh 43 thousand was stolen from construction site in Katvi village maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन
– वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली
– मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार