श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा 26 व्या गळीत हंगामाला खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, देहू संस्थांनचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी आमदार शरद ढमाले आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले तसेच कारखान्याचे संचालक उपस्थित हाेते. साखर कारखान्यामध्ये बॉयलरच्या पूजनानंतर ऊस टाकून गळीत हंगामाचा मान्यवरांनी शुभारंभ केला. तसेच आजपासून शेतकऱ्यांचा ऊस घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये लगबग दिसून येत आहे. तर कारखान्याबाहेर ऊसतोड कामगारांची देखील लगबग दिसून आली.
साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन आणि गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प. शांतीब्रम्ह गुरुवर्य मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशीद, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माजी सभापती एकनाथराव टिळे, माजी सभपाती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळ भाजपा अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, जेष्ठ नेते बबनराव भेगडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक आजी माजी पदाधिकारी सभासद व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Bhoomipujan of Ethanol Project of Sant Tukaram Maharaj Cooperative Sugar Factory )
अधिक वाचा –
– धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु
– ‘वेळ घ्या, पण आरक्षण द्या’, मनोज जरांगे पाटलांकडून दुसरं उपोषण मागे, कोणत्या अटींवर उपोषण सोडले? वाचा सविस्तर
– मोठी कारवाई! विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, तब्बल 1 कोटीचा मुद्देमाल ताब्यात