व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गणेशमूर्तीकारांना मोठा दिलासा ! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मूर्तीकारांना गणेशोत्सवपूर्वी दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 10, 2025
in महाराष्ट्र
POP Ganpati Ganesh Idol POP Shadu Ganpati

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मूर्तीकारांना गणेशोत्सवपूर्वी दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींवरील बंदी न्यायालयाने उठवली आहे. या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पीओपी मूर्ती घडविण्यावर आणि त्याची विक्री करण्यावर बंदी नसल्याची सुधारित भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) सोमवारी उच्च न्यायालयात मांडली. तथापि, पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतील विसर्जनाला मनाई कायम राहील, असेही सीपीसीबीने स्पष्ट केले. पीओपी मूर्तीसंदर्भातील आपण आखलेली मार्गदर्शक तत्त्वे ही केवळ सूचना किंवा शिफारसींच्या स्वरूपात आहेत, असे देखील सीपीसीबीतर्फे उपरोक्त भूमिका मांडताना स्पष्ट करण्यात आले.

  • सीपीसीबीच्या भूमिकेनंतर पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाबाबत राज्य सरकारने ३० जूनपर्यंत तोडगा काढावा आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. तथापि, न्यायालयाच्या परवानगीशिवाय पीओपी मूर्ती विसर्जन केले जाणार नाही, असेही न्यायालयाने बजावले.

विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी देणे शक्य असल्याचा दावा राज्य सरकारने मागील सुनावणीच्या उच्च न्यायालयात केला होता. वादग्रस्त मुद्याच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींचा दाखला देऊन सरकारने हा दावा केला होता. तसेच, समितीचा शिफारशींचा अहवाल निर्णयासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) पाठवल्याचेही न्यायालयात सांगितले. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारशींवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने सीपीसीबीला दिले होते.

या शिफारसी विचारात घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे पीओपी मूर्ती घडवण्यावर आणि त्याच्या विक्रीवर बंदी नसल्याचे, आपली मार्गदर्शक तत्त्वे सूचना स्वरुपात असल्याची नवी भूमिका सीपीसीबीने न्यायालयात मांडली. परंतु, मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांत केले जावे, असेही सीपीसीबीने स्पष्ट केले. त्यामुळे, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनाचा मुद्दा कायम राहिल्याने त्याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

तत्पूर्वी, पीओपीबाबत कुठेतरी मध्यम मार्ग काढायला हवा. त्यामुळे, सरकारने या मुद्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने आपल्या अहवालात समुद्रात पीओपी मूर्तींचे विसर्जन करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. समितीचा अहवाल सीपीसीबीकडे पाठवण्यात आला असून सीपीसीबीच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचे सरकारच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंबी मावळ येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News
– नाणे मावळातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कौशल्या पवार यांची निवड । Maval News
– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News


Previous Post

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस ; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

Next Post

लोणावळा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रशासनाला निवेदन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shivshahi Traders Association statement to the administration regarding civic problems in Lonavala

लोणावळा शहरातील नागरी समस्यांबाबत शिवशाही व्यापारी संघाचे प्रशासनाला निवेदन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.