जांभूळ गावातील सिमांतीनी महिला विविध पापड उत्पादक गटातील महिलांना पापड बनवण्यासाठी सहाय्यक मशिनसाठी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि बेलस्टार (CSR) यांच्या मार्फत आर्थिक मदत करण्यात आली आहे. सदर पापड बनवण्याच्या सहाय्यक मशिनद्वारे जांभूळ गावातील सिमांतिनी महिला विविध पापड उत्पादक गटातील एकूण 12 महिलांना फायदा होणार आहे. ( Big Support From Hand In Hand Organization Talegaon Dabhade And Belstar To Papad Producer Women Group Of Jambhul Village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पापड बनवण्यासाठीचे हे सहाय्यक मशिन देऊन व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या ग्रामीण आणि शहरी भागात विविध प्रकारचे आणि चवदार पापडची मागणी वाढत आहे. तेव्हा या अशा मशिनद्वारे व्यवसायात वाढ होऊन महिलांना जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यात मदत होणार आहे. तसेच महिलांमधे व्यावसायिक ज्ञानाची भर पडणार आहे.
या कार्यक्रमाला हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून अनिल पिसाळ, परमेश्वर कांबळे, मोहन सोनवणे, सारिका शिंदे आणि पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. सिमांतीनी महिला विविध पापड उत्पादक गट महिला प्रतिनिधी यांनी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे आभार मानले.
अधिक वाचा –
– उल्लेखनीय समाजकार्याबद्दल आण्णासाहेब दाभाडे यांना पानिपतकार विश्वास पाटलांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’
– मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल