व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग

देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2024
in देश-विदेश
Narendra Modi Rahul Gandhi Om Birla

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. मंगळवारी (दि. 25 जून) सायंकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची निवड झाली. तर बुधवारी (दि. 26 जून) सकाळी ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तब्बल 48 वर्षांनंतर लोकसभा अध्यक्षांची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये उपाध्यक्षपदावर असहमती झाल्यानंतर काँग्रेसने केरळमधील खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे 1976 नंतर पहिल्यांदाच अशी निवडणूक संसदेत पार पडली. मात्र हंगामी अध्यक्षांनी आवाजी मतदानाद्वारे ओम बिर्ला यांना विजयी घोषित केले. ( BJP MP Om Birla elected as Speaker of the 18th Lok Sabha Rahul Gandhi Leader of Opposition )

संसदेत पाहायला मिळाला दुर्मिळ प्रसंग –
ओम बिर्ला यांची निवड जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उठून ओम बिर्ला यांच्या जागेवर गेले. तिथे मोदींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यांच्यात काही बोलणी सुरू होताच पाठीमागून विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राहुल गांधी हे देखील ओम बिर्लांचे अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांना पाहताच मोदींनी हाताने त्यांना पुढे येण्याची विनंती केली. राहुल गांधींनी पुढे होत ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांना अभिनंदन केले. त्यानंतर लागलीच त्यांनी मोदींकडे पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राहुल गांधींकडे बघून हसतमुखाने हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोघांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत सोबत केली.

#WATCH | BJP MP Om Birla occupies the Chair of Lok Sabha Speaker after being elected as the Speaker of the 18th Lok Sabha.

Prime Minister Narendra Modi, LoP Rahul Gandhi and Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju accompany him to the Chair. pic.twitter.com/zVU0G4yl0d

— ANI (@ANI) June 26, 2024

कोण आहेत ओम बिर्ला?
ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2014 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. बिर्ला यांचा जन्म 1962 साली झाला. 1987 साली कोटा येथील भाजपाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यापूर्वी 2003 ते 2014 पर्यंत कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आणि राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले.

अधिक वाचा –
– दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
– आमदारसाहेब..! मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची अपूरी कामे आणि रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आवाज उठवा
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade

Next Post

‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval taluka Youth Congress

'साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..' मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.