पुणे इथे शुक्रवार (दिनांक 25 नोव्हेंबर) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
‘मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे एकीकडे सांगितले जाते. तर दुसरीकडे इतर भागातील पुनर्वसित शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांना मावळ तालुक्यातील जागा दिल्या जातात. याचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,’ अशी मागणी सदर बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी केली. ( Canal Committee Meeting In Presence Of Chandrakant Patil And Ajit Pawar MLA Sunil Shelke Get Aggressive For Pavana Dam Issues )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.अजितदादा पवार @AjitPawarSpeaks व पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील @ChDadaPatil यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आज संपन्न झाली. https://t.co/pHUS577Azs#pawna #pawnadam #maval #sunilshelke pic.twitter.com/9sYbEATbjj
— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 25, 2022
तसेच, ‘एका महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला नाही, तर पवना धरणग्रस्तांसमवेत आंदोलन उभारुन धरणाचे पाणी बंद करण्यात येईल,’ अशा तीव्र भावना सुनिल शेळकेंनी व्यक्त केल्या.
त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत दहा दिवसांत बैठक आयोजित करुन सकारात्मक निर्णय घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत आश्वासित केले. ( Canal Committee Meeting In Presence Of Chandrakant Patil And Ajit Pawar MLA Sunil Shelke Get Aggressive For Pavana Dam Issues )
अधिक वाचा –
– पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतचा अंतिम अहवाल 15 दिवसांत सादर करावा – आमदार सुनिल शेळके
– ‘सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने रस्त्याची रुंदी आणि दिशा बदलल्यास…काम थांबवू’, वडगाव भाजपचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
– हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेतर्फे तुंग गावात सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती कार्यक्रम