व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही ठाकर समाजातील अनेक नागरिकांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in लोकल, ग्रामीण
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या आदिम सेवा अभियानांतर्गत चांदखेड चंदनवाडी येथील 54 ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप रविवार (दि. 14 जानेवारी) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपसरपंच मनोज येवले, राकेश घारे, चांदखेड सरपंच मिना माळी, उपसरपंच सागर गायकवाड, सदस्य प्रमोद गायकवाड, दादा केदारी, रुपाली गायकवाड, पुजा कदम, उर्मिला गावडे, वैशाली गायकवाड, संजय गायकवाड, गोरख हिंगे, मधुकर जाधव, राजू गावडे, रोहिदास जाधव, संदीप गावडे आणि आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही ठाकर समाजातील अनेक नागरिकांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत. शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. महत्वाची कागदपत्रे नसल्याने अनेक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. आजपर्यंत विविध शिबिरे घेऊन योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात. परंतु महत्त्वाचे जात प्रमाणपत्र कोणीही मिळवून देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.

परंतू आमदार सुनिल शेळके यांनी आदिम सेवा अभियान प्रभावीपणे राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ( caste certificates distributed to thakar community citizens through mla sunil shelke chandkhed maval )

‘ठाकर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. माझ्या ठाकर बांधवांना त्यांचा अधिकार मिळाला याचे समाधान आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहील.’ – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local
– तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?
– मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे


dainik maval jahirat

Previous Post

शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला ‘राजाश्रय’; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात

Next Post

मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kite-Festival-vadgaon-maval

मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.