पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप आणि कामे अंतिम करण्याचे नियोजन सध्या भाजपाचे मावळ तालुक्यातील माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पातळीवर सुरू आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार बाळा भेगडे तसेच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यामधील भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातील स्थानिक नेते, कार्यकते यांच्याशी समन्वय साधून कामांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Chandrakant Patil Gave Pune District Fund Distribution Responsibility To BJP Maval Bala Bhegde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांवर प्रशासक असल्याने सन 2022-23च्या संपूर्ण निधीचे वाटप आणि कामांचे नियोजन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीनुसार करण्यात आले. त्यामुळे एकूण निधीचा 60 टक्के निधी एकट्या बारामती, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यात वाटप करण्यात आला आणि शिल्लक 40 टक्के निधीचे अन्य दहा तालुक्यांत वाटप करण्यात आला होता, असे पाटील म्हणाले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन बारामती, इंदापूर आणि आंबेगावच्या निधीला मोठा कट लावत जिल्ह्यात सर्व तालुक्यांना समान निधी वाटप करण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार आता नव्याने जिल्हा नियोजन समितीच्या कामांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून ग्रामीण भागातील कामांची यादी मागवण्यात येत आहे. बाळा भेगडे आणि राहुल कुल हे सर्वांकडून याद्या घेऊन कामे निश्चित करण्याचे काम करत आहे.
पुणे जिल्ह्यासाठी सध्या 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 875 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी वाटप आणि नियोजन करण्याची जबाबदारी आता भेगडे आणि कुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– बऊरमध्ये श्रीगणेश मूर्ती प्राण-प्रतिष्ठा सोहळा संपन्न, हभप सचिन महाराज जाधव यांच्या कीर्तनाला हजारोंची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ‘या’ 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड