चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूकीसाठी आज ( 26 फेब्रुवारी ) रोजी मतदान होत आहे. अतिशय तुल्यबळ उमेदवार असलेल्या या ठिकाणच्या पोटनिवडणूकीत तिरंगी लढत होत आहे. आज मतदानासाठी मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांबाहरे मतदारांनी रांगा लावल्याचे दिसत असून नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. परंतू एका मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. ( Chinchwad Assembly By-Election Controversy outside polling station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर ही झटापट झाली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांनी मतदान केले त्या केंद्रावरच वाद झाल्याने खळबळ उडली आहे. मतदान केंद्रावर थांबण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती निवळली. सध्या दोघेही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपाकडून आश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे रिंगणात आहेत.
अधिक वाचा –
– वृद्ध जोडप्यांना लक्ष्य करुन दरोडा टाकणारी टोळी गजाआड, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई
– कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी