शिरगाव येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाखांची नुकसानभरपाई अदा करण्यात आली. बुधवार 17 ऑगस्ट 2022 रोजी शिरगाव येथे राहणारे राजाराम वामन गोपाळे (वय 65) हे संध्याकाळी सहाच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता महावितरणच्या तुटलेल्या तारांचा स्पर्श त्यांच्या पायाला झाला. व जोरात विजेचा धक्का बसून ते खाली कोसळले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
शेतातून बराच वेळ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी सुमन या शेतात शोधण्यास गेल्या असता त्यांना ते चिखलात पडल्याचे दिसले. त्यामुळे जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता सुमन यांना देखील विजेचा धक्का बसला व त्या जोरात ओरडल्या. हा आवाज ऐकून बाजूला असलेले बापू गोपाळे धावून आले व त्यांच्या लक्षात आले की दोघांनाही विजेचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी हातात बूट घालून सुमन यांना बाजूला केले. बेशुद्ध अवस्थेत असलेले राजाराम गोपाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ( compensation to family of deceased farmer in shirgaon maval from Mahavitaran efforts By MLA Sunil Shelke )
- महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वयोवृद्ध शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गोपाळे यांच्या कुटुंबियांना महावितरणकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतू दिड वर्ष महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारुन देखील त्यांची दखल घेतली जात नव्हती. अखेर 15 फेब्रुवारी 2024 रोजी आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेमध्ये मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी मदत करण्याची मागणी केली होती.
आमदार सुनिल शेळके यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना दिल्या होत्या. शुक्रवार 22 मार्च 2024 रोजी महावितरणने सुमन गोपाळे यांच्या खात्यामध्ये चार लाख रुपये वर्ग करुन नुकसान भरपाई अदा केल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी दिली.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा
– लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक