Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळेगावचे शहराध्यक्ष संतोष भेगडे यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी होत असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलिसांत दिली आहे. समाज माध्यमांवर फोटोंसोबत छेडछाड करुन खोट्या आशयाचा मजकूर प्रसिद्ध करून आपली बदनामी केली असल्याची तक्रार माजी नगरसेवक संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली आहे. बदनामी करून आपले सामाजिक, राजकीय व आर्थिक नुकसान करण्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचे भेगडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हटलंय अर्जात ?
आपण बांधकाम व्यवसायिक असून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. तळेगाव नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून काम करण्यासोबत पक्षाने विविध पदे दिली आहेत. सर्वकाही चांगले सुरू असताना काही व्यक्तींकडून आपली समाजमाध्यमांवर बदनामी होत असल्याचे कुटुंबातील व्यक्ती आणि समर्थकांकडून समजले. आपली बदनामी करण्याच्या हेतूने फोटोत छेडछाड करून बदनामीकारक मजकूर छापला आहे. असे संतोष भेगडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. सोबत अर्जात काही व्यक्तींची नावे देखील त्यांनी नमूद केली आहेत.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
सामाजिक बदनामी करण्याच्या हेतूने आणि व्यवसायात अडचणी निर्माण होण्याकरिता ही बदनामी समाजमाध्यमातून होत असून सदर षडयंत्रात सामील असणाऱ्यांवर सायबर क्राइम कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करावी. तसेच बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे यांनी तक्रार अर्जातून केली आहे.
कोण आहेत संतोष भेगडे?
संतोष मारुती उर्फ छबुराव भेगडे हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए चे सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहराचे ते शहराध्यक्ष आहेत. यासह तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ते माजी नगरसेवक आहेत. यासह विविध सामाजिक संघटनांवर ते सध्या काम करत आहेत. ( Complaint of Santosh Bhegde to Talegaon Dabhade Police for defamation on social media )
अधिक वाचा –
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News