आज (बुधवार, 30 नोव्हेंबर) रोजी पहाटे 4.00 वाजताच्या दरम्यान ट्रेलर (क्र MH 46 BM 9397) वरील चालक अजित जाधव (वय 25 वर्ष रा. इरली ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) हा पुणे ते मुंबई बाजूकडे जात असताना सदर टेलरचे टायर फुटले त्यामुळे नियंत्रण सुटल्याने टेम्पो (क्र MH 13 DQ 3101) यास प्रथम मागील डाव्या बाजूस धडक दिली. त्यानंतर बाजूने जात असलेला ट्रक (क्र KA 39 A 0344) यास ठोकर मारल्याने सदरचा ट्रक विरुद्ध दिशेला वळला आणि उलटला. ( Container And Truck Lost Control Accident On Mumbai Pune Expressway Borghat 1 killed )
त्याच ट्रेलरने पुढे जाणाऱ्या ट्रक (क्र KA 51 AG 5978) यास पाठीमागून जोरात धडक दिल्याने रस्त्याचे कडेला असलेली लोखंडी रेलिंग तोडून सदरचा ट्रक हा सुमारे 100 फूट खोल दरीत पडला आहे. तसेच त्याच्या मागोमाग टेलर (क्र MH 46 BM 9397) या वाहनांची केबिन तुटून 100 फूट खोल दरीत पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अपघातात टेलर (क्र MH 46 BM 9397 वरील चालक अजित जाधव (रा इरली ता. कवठेमहांकाळ जि. सांगली) यास गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने तो मयत झाला. तसेच ट्रक क्र (KA 51 AG 5978) वरील चालक मंगळू हा ट्रकच्या केबिन मध्ये अडकल्याने त्यास देवदूत टीम, आय आर बी पेट्रोलिंग, खोपोली पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे सदस्य, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी खूप प्रयत्नांती चालकाला बाहेर काढले.
हेही वाचा – कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव
त्यास गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला उपचाराकरिता IRB अंबुलन्सने MGM हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले आहे. तसेच मयत यास खोपोली नगर पालिका हॉस्पिटल खोपोली येथे रवाना करण्यात आले. अपघातातील वाहने रस्त्याच्या कडेला केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेला असल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ( Container And Truck Lost Control Accident On Mumbai Pune Expressway Borghat 1 killed )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील ‘या’ गावांत घरोघरी येणार जलगंगा, आमदार शेळकेंच्या माध्यमांतून 4 कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन
– खादी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमनपदी महायुतीच्या कांचन भालेराव, राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग