मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी पायी दिंडी पायी वारीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबत मावळचे तहसिलदार विक्रम देशमुख यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मावळ तालुका यांच्यावतीने निवेदन पत्र देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील हजारो वारकरी संप्रदायातील वारकरी बांधव दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला देहू-आळंदी-पंढरपूर पायी वारी करत असतात. पायी वारी करताना बरेचदा अपघात होत असतात. गेल्यावर्षी अपघात होऊन काही वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच काही वारकरी गंभीर जखमी झाले होते. या सर्व बाबी लक्षात घेता मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांसाठी आषाढी एकादशीच्या वारीसाठी स्वतंत्र मार्गिका उभारावी. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रूग्णवाहिका व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्ष मावळ तालुका यांच्यावतीने करण्यात आली. ( demand of Shiv Sena Thackeray group Maval taluka to make separate route for Warkari to Dindi on foot )
निवेदन देताना शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका संघटक अशोक निकम, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, तालुका सल्लागार रमेश जाधव, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, तालुका समन्वयक रविंद्र गायकवाड, देहूरोड सल्लागार देवा कांबळे, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शोभीनाथ भोईर, युवासेना मावळ उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, विभाग प्रमुख भरत भोतेन व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस
– वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश