व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तळेगावमधील ‘म्हाडा’तील पात्र सदनिकाधारकांना घरांचा ताबा लवकर मिळावा’, आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात मागणी

तळेगाव दाभाडे शहरातीलस म्हाडातील सदनिकाधारक न्यायाच्या प्रतीक्षेत

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
talegaon-mhada-project

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरातील म्हाडा अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पातील सदनिकाधारकांना प्रत्यक्ष ताबा मिळावा व आकारण्यात आलेली वाढीव रक्कम रद्द करावी यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्काची घरे दिली जातात. तळेगाव दाभाडे शहरातील म्हाडाच्या प्रकल्पाची २०१८ ते २०२१ या काळात लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली होती, यावेळी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे १३ लाख ९८ हजार इतकी होती. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी अर्ज केले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अडीच लाख इतके अनुदान देण्यात येते. सदर अनुदान वजा करुन या प्रकल्पातील सदनिकेची किंमत ११ लाख ४८ हजार रुपये होते. या प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांमध्ये कामगार, कष्टकरी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसामान्य नागरिक आहेत.या प्रकल्पातील सदनिकेसाठी ७३० नागरिक पात्र ठरले. या सदनिकांचा ताबा मिळण्यासाठी ५८८ सदनिकाधारकांनी मुदतीनुसार नव्वद रक्कम भरली आहे.

  • सदर प्रकल्पाचे काम जून २०१८ मध्ये सुरु करण्यात आले आणि प्रकल्प पूर्ण करण्यास म्हाडाकडूनच तीन वर्षांचा विलंब झाल्याचे दिसत आहे. कोरोना, इमारत परवानगी, संबंधित ठेकेदाराकडून संथ गतीने काम या कारणांमुळे प्रकल्पाच्या कामास विलंब झाला असून आजपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. प्रकल्पास झालेल्या विलंबामुळे पात्र लाभार्थ्यांना २ लाख ५२ हजार इतकी वाढीव अतिरिक्त रक्कम भरा असे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे धाव घेत यावर मार्ग काढण्याची मागणी केली.

सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांची यामध्ये काही चुक नसताना त्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्व सदनिकाधारकांना घरांचा ताबा मिळावा, अतिरिक्त वाढीव रक्कम रद्द करावी याकरिता गृहनिर्माण विभागाकडे आमदार सुनिल शेळके यांनी पत्रव्यवहार केला. यावर मंत्री महोदयांनी पुणे गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे येथे आमदार सुनिल शेळके, संबंधित विभागाचे अधिकारी व सदनिकाधारक यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देऊ व वाढीव आकारलेली रक्कम रद्द करु असे आश्वासित करण्यात आले होते. ( mla sunil shelke raised problem of flat owners of talegaon dabhade MHADA project )

परंतु बैठकीनंतर आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले. तसेच घरांचा ताबा न मिळाल्याने सर्व लाभार्थी घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरत आहेत. तसेच त्यांना घरभाडे देखील द्यावे लागत असल्याने त्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे. सर्व पात्र लाभार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करता शासनाने त्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा व आकारलेली वाढीव रक्कम रद्द करावी अशी मागणी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे आमदार शेळके यांनी अधिवेशन सभागृहात उपस्थित केली. या प्रकरणात राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. म्हाडाकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त वाढीव शुल्क रद्द करावे आणि लवकरात लवकर घराचा ताबा त्यांना द्यावा अशी मागणी अधिवेशनात केली आहे. लवकरच यावर योग्य निर्णय होईल अशी आशा आहे. – आमदार सुनिल शेळके

  • ‘मागील पाच वर्षांपासून आम्हांला आमच्या स्वप्नातील घर मिळावे यासाठी आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. आमदार सुनिल शेळके यांनी आमची बाजु मांडून याबाबत आवाज उठवला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’ – ईश्वर पाटील (म्हाडा सदनिकाधारक)

अधिक वाचा –
– आढे गावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार
– नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस
– वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

‘मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांना पायी दिंडीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करावी’, शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन

Next Post

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
indrayani-river

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.