व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रक्षक बनले भक्षक! श्रीमंत मुलाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत 5 लाख उकळले, दोन पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा । Dehu Road Crime

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' अर्थात 'सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाष' असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस दलाची मान शर्मेने खाली आणण्याची वेळ देहूरोड येथे आणली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dehu-Road-Police-Station

File Image - Dehu Road Police Station


किवळे येथील नामांकीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थाला अं’मली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी नेट बँकींग तसेच बँक खात्यात पैशाची मागणी करत तब्बल 4 लाख 98 हजार उकळल्याची धक्कादायक घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण कटात दोन पोलिसांचा देखील सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अर्थात ‘सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाष’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस दलाची मान शर्मेने खाली आणण्याची वेळ देहूरोड येथे आणली आहे. किवळे येथील विद्यालयात शिकणाऱ्या वैभवसिंग चौहान या विद्यार्थ्यांकडून 8 आरोपींनी संगणमत करून 4 लाख 98 हजार लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांसोबतच देहरोड कॅन्टोमेंट बोर्डचा माजी उपाध्यक्ष अमीन शेख याचा मुलगा अमन अमीन शेख हा देखील या गुन्ह्यात आरोपी आहे. (demands ransom from rich boy threatening to implicate him in ganja case crime registered against 8 people dehuroad)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चौधरी, अमन अमीन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्ज़ा, शंकर गोर्डे, मुनामस्वामी, पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ (नेमणूक देहुरोड पोलीस ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी क्रमांक 1 ते 4 पोलिसांच्या ताब्यात असून 4 जण आद्याप फरार आहेत. संबंधित गुन्ह्यात फिर्यादी विद्यार्थ्याकडून 20 लाख रुपयाची आरोपींनी मागणी केली होती. गंहुजे स्टेडीयम जवळ नेऊन तसेच पोलीस ठाण्यात बळजबरीने बोलावून धमकावत वेळोवेळी नेट बॅकिंग, गुगल पे, तसेच बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये विद्यार्थ्याकडून 4 लाख 98 हजार उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपींच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी वैभव सिंग याने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पालकांनी या घटनेची माहिती थेट वरीष्ठ अधिकाऱ्यांना देत देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील अरोपी अमन अमिन शेख याच्यावर काही महिण्यापूर्वी अशाच प्रकारचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांना हताशी धरून वरील सहा आरोपींनी हा गुन्हा केला असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल तक्ररी वरून दिसून येत आहे. गुन्ह्यात फरार असलेले पोलीस कर्मचारी हेंमत गायकवाड, सचीन शेजाळ यांच्या सह इतर दोघांचा शोध देहुरोड पोलीस घेत आहे.

अधिक वाचा –
– ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News
– काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला
– ।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा


Previous Post

‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल 2300 स्पर्धकांची नोंद । Vadgaon Maval

Next Post

तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची ‘आमसभा’, आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-AamSabha

तब्बल 7 तास चालली मावळ तालुक्याची 'आमसभा', आमदार शेळकेंच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या समस्यांची ऑन दी स्पॉट सोडवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
Tragic incident An 80-year-old man died after falling into a well in Takve Budruk Maval

दुर्देवी घटना ! टाकवे बुद्रुक येथे विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

April 7, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी राज्यातील १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत

April 7, 2026
Two new metro projects should be approved in Maval taluka Bala Bhegde demands from CM Devendra Fadanvis

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 7, 2026
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

April 6, 2026
Lonavala Smart City development plan Focus on AI based CCTV road beautification traffic management

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

April 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.