तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून वेळेवर मिळावी या मागणीसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद इथे मुख्याधिकारी विजयराव सरनाईक यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (शुक्रवार, 31 मार्च) रोजी निवेदन देण्यात आले.
तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढवून आणि वेळेवर मिळावी या मागणीसाठी आणि पीएमपीएमएल (PMPML) बस थांबे उभारण्याच्या मागणीसाठी (PMPML) पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या भेटीचे संदर्भपत्र देऊन भाजपच्या शिष्टमंडळाने आज तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे मुख्याधिकारी विजयराव सरनाईक यांना निवेदन दिले. ( Disabled Peoples Should Get Pension By Increasing And On Time Talegaon BJP Letter To Nagar Parishad CEO )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘आपल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी मासिक पेन्शन योजना सुरु करण्यात आली होती. मागील वर्षी ही पेन्शन संपूर्ण वर्षाची 26,900 रुपये देण्यात आली होती. म्हणजे 2241 रुपये प्रति महिना. त्याआधी त्यांना 3000 रुपये प्रती महिना याप्रमाणे पेन्शन मिळत होती. या हिशोबाने त्यांना वार्षिक 36000 रुपये मिळायला हवी होती. तरी कृपया त्यांना आगामी 2023-24 ची पेंशन वार्षिक 36000 रूपये लवकरात लवकर देण्यात यावी. दुर्दैवाने दिव्यांग बांधवांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कृपया आपण सहानुभतीपूर्वक विचार करुन निर्णय घ्यावा ही अपेक्षा.’ असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी भाजपा तळेगाव शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस शोभा परदेशी, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सांस्कृतिक आघाडी उपाध्यक्ष अमोल गोरे, दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर नंदवरम आणि सह खजिनदार किशोर कुलकर्णी हे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत
– कॉन्ट्रॅक्टचा आपसी वाद टोकाला, कंपनीच्या बांधकाम साईटवर जात मारहाण, तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल