राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) पुणे यांच्यावतीने आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील श्री साईबाबा सेवाधाम, कान्हेफाटा इथे दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम – 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष या नात्याने डॉ. राजेश देशमुख हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक आहेत. ( Disaster Friend Training Camp At Kanhe Phata In Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अगदी पहिल्या दिवसापासूनच या प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वतः डॉ. राजेश देशमुख (मा जिल्हाधिकारी), हिम्मत खराडे (निवासी उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले. मावळ, मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र असे एकूण 87 तरुण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेत.
सदर 12 दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत आपत्ती व आपत्तीचे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भुकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम शवाच्छोश्वास (CPR), आग व आगीचे प्रकार, व्हर्टीकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तिथे जाऊन मदत कार्य करून जिवितहानी टाळू शकतात.
मानवी कुबडी, पाठीवर सरळ घेणे, अग्निशमनदल कर्मचारी उचल, अग्निशमन दल रांगणे, जिन्यावरून खाली आणणे, 2/3/4 हातांची बैठक, विविध आपत्कालीन स्ट्रेचर इत्यादी गोष्टीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर यांचे नियोजनाअंतर्गत सायली चव्हाण आणि ओंकार पोखरकर हे समन्वय म्हणून कार्य करत आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनील गायकवाड, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश संपतराव गराडे यांनी सहकार्य केले.
अधिक वाचा –
– फुफ्फुसात दुर्मिळ गाठ असणाऱ्या तरुणावर यशस्वी उपचार; तळेगावमधील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये शस्त्रक्रिया
– दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
– गुडन्यूज! शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबतच जानेवारीचे धान्य, मोबाईल क्रमांक जोडण्याचेही आवाहन