हॅण्ड इन हॅण्ड इंडिया तळेगाव दाभाडे संस्था आणि युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स (USGI) यांच्यामार्फत तुंग गावातील शेतकरी लाभार्थ्यांना 1100 (केशर) आंबा रोपे वाटप करण्यात आली. शनिवार, दिनांक 7 ऑक्टोबर रोजी ही रोपे वाटप करण्यात आली. आंबा रोपे वाटप कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्याचे अतिरिक्त उत्पन्न वाढवणे, कार्बन उत्सर्जन नियंत्रण आणि जमिनीची धूप कमी करणे असा आहे. ( Distribute of 1100 keshar mango seedlings to beneficiary farmers of Tung village )
सदर कार्यक्रमात अनिल पिसाळ आणि अभिजीत अब्दुले यांनी आंबा रोपांचे संगोपन व व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तुंग गावचे सरपंच, उपसरंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. आंबा रोपे वाटप कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून अनिल पिसाळ, अभिजीत अब्दुले, कोमल लोहकरे इत्यादी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर
अधिक वाचा –
– दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर
– शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम
– वडगावात रास दांडिया गरबा 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; मोरया महिला प्रतिष्ठानचा उपक्रम