व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल’चा दिवेश पालांडे ठरला पहिला ‘रायगड केसरी’ किताबाचा मानकरी

या स्पर्धेत कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातील कुस्तीगीरांनी सर्वच वयोगटातील वजनी गटात आपले प्राबल्य दाखवले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 8, 2023
in महाराष्ट्र
raigad-khopoli-wrestling

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान, ईगल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून रोजी “भावी खासदार – रायगड केसरी स्पर्धा २०२३” चे भव्य आयोजन हातणोली – चौक येथील भव्य मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत खोपोली येथील राजाराम कुंभार संचालित कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातील खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रायगड केसरी होण्याचा पुरुष गटाचा पहिला मान दिवेश दत्तात्रय पालांडे याला मिळाला तर उप रायगड केसरी याच संकुलातील ओमकार सदाशिव निंबळे हा ठरला. महिला गटात दिव्या भरत शिंदे हिने रायगड केसरी होण्याचा हा मान पटकावला तर उप विजेती पनवेलची अमेघा घरत ही ठरली. ( divesh palande from khopoli won Raigad Kesari title in wrestling tournament )

या स्पर्धेत कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलातील कुस्तीगीरांनी सर्वच वयोगटातील वजनी गटात आपले प्राबल्य दाखवले.

१४ वर्षा खालील मुलींमध्ये
क्षितिजा मरागजे ४६ किलो गटात हिने प्रथम,
प्रणाली घनवट ५४ किलो गटात प्रथम,
आस्था मरागजे ३५ किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.

१७ वर्षा खालील मुलांमध्ये
वेद दिनेश मरागजे ३५ किलो गटात प्रथम,
सार्थक शिंदे ४० किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.

१७ वर्षा खालील मुलींमध्ये
सई संजय शिर्के ४० किलो गटात प्रथम,
तेजस्विनी शेंडे ४९ किलो गटात प्रथम,
वैष्णवी कुंभार ५३ किलो गटात प्रथम क्रमांक पटकवला.

१७ वर्षा खालील मुलांमध्ये
सोहेल शेख ५५ किलो गटात प्रथम
विघ्नेश ससे, ४५ किलो गटात द्वितीय
श्लोक धावळकर ५० किलो गटात द्वितीय क्रमांक पटकवला.

महिला रायगड केसरी गट
पायल मरागजे ५० किलो गटात प्रथम,
रोशनी परदेशी ५३ किलो गटात प्रथम,
प्रांजली कुंभार ५७ किलो गटात प्रथम,
प्राची भोईर हिने तृतीय क्रमांक पटकवला.

हेही वाचा – लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील

पुरुष रायगड केसरी गट

दिवेश पलांडे हा मानाच्या रायगड केसरी गदेचा विजेता तर ओमकार निंबळे उपविजेता ठरला तर याच गटात जयेश खरमारे याने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. उपविजेत्या ठरलेल्या ओमकार निंबळे यांने रायगड केसरी दिवेश पालांडे याला खांद्यावर उचलून घेत खिलाडू वृत्तीचे केलेले प्रदर्शन या स्पर्धेचे आकर्षण ठरले.

२०१८ मध्ये आपल्या स्व. भाऊ साहेब कुंभार यांच्या कुस्ती खेळाला मानाचे स्थान मिळावे या उदात हेतूने शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते राजाराम कुंभार यांनी संकुलाची स्थापना केली आहे. मागील चार वर्षात ५ राज्यस्तरीय पदक विजेते तर १ राष्ट्रीय पदक विजेता व ३ ऑल इंडिया स्थरावरचे खेळाडू घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केले असून संस्थेच्या माध्यमातून भविष्यात याही पेक्षा अधिक स्वरूपाची कामगिरी करण्याचे ध्येय ठेवले आहे.

कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे अध्यक्ष – राजाराम कुंभार, सचिव – रायगड भूषण तथा राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते जगदिश मरागजे, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, कुस्ती मार्गदर्शक विजय चव्हाण याचे मोलाचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले आहे. तर सल्लागार देवदूत गुरुनाथ साठेलकर, दिनेश मरागजे, भरत शिंदे, संदीप पाटील, सुरेश चव्हाण, शरद ढवाळकर, समीर शिंदे, अमित विचारे, प्रवीण शेंद्रे यांचे सहकार्य लाभत असते.

या स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मा. आम. बाळराम पाटील, तालुका तालीम संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, विभागीय सचिव मारुती आडकर, केटीएसपी अध्यक्ष संतोषजी जंगम जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष घासे, जितेंद्र सकपाळ, ज्ञानेश्वर सोगे, डॉ रणजित मोहिते, लायन्स क्लब खोपोलीच्या अध्यक्षा शिल्पा मोदी, माजी अध्यक्ष महेश राठी, खोपोली पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा –
– मोबाईल चोरी करणारे 3 सराईत गजाआड, 13 मोबाईलसह लाखोचा मुद्देमाल जप्त, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई
– वडगावमध्ये ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम, तब्बल 1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ


Previous Post

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार

Next Post

वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-ssc-hsc-results

वडगाव शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रतिमा देऊन सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.