व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी

पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. राज्यभरातील अन्य काही मंदिरांमध्येही तोकडे कपडे घालून दर्शनास येण्यास बंदी आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
temple-pune

fime image - temple


पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. राज्यभरातील अन्य काही मंदिरांमध्येही तोकडे कपडे घालून दर्शनास येण्यास बंदी आहेत. त्यात आता पुणे जिल्ह्यातील एकूण 71 मंदिरांमध्ये अशाप्रकारे वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रवेश करताना तोकडे किंवा अशोभनीय कपडे घातलेले चालणार नाहीत. महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या ओझर येथे झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील 71 मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू होईल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन –
वस्त्र संहिता लागू करून कोणावरही बंधने टाकण्याचा उद्देश नाही. मंदिरात येताना भाविकांचे आपल्या संस्कृतीनुसार कपडे असावेत. जसे की आपण पूजाअर्चा करताना धोतर नेसतो, महिला साडी घालून पूजा करतात. त्याचप्रमाणे मंदिरात येताना तोडके अपुरे कपडे नसावेत. सलवार कुर्त्यासारखे अंग झाकून असणारे कपडे असावेत, हा उद्देश आहे. अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. दक्षिण भारतात लुंगी गुंडाळून मंदिरात जावे लागते, घृष्णेश्वर मंदिरात अंगावरचा शर्ट काढून मंदिरात जावे लागते. त्यामुळे याचा प्रमुख उद्देश फक्त मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आहे. तरी नागिरकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 528 मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आल्याची माहिती आहे. ज्याप्रमाणे सरकारी कर्मचारी, शाळा, विद्यालये यांना वस्त्रसंहिता आहे. तशीच मंदिरात असेल. अनेक वेळा मंदिरात येणारे भाविक फाटलेले जीन्स, टी-शर्ट तसेच शॉर्ट पॅन्ट यांसारखी कपडे घालून येतात. त्यामुळे इतरांना जशी वस्त्र संहिता आहे, त्याच प्रमाणे मंदिरात येणाऱ्यांसाठी देखील वस्त्र संहिता लागू करण्यात येणार आहे. ( dress code has been implemented in 71 temples of pune city and district )

पुणे जिल्ह्यातील पुढील मंदिरात वस्त्रसंहिता लागू –
1 ) श्री ग्रामदैवत कसबा गणपती, पुणे
2) चतुश्रृंगी देवस्थान पुणे
3 ) श्री भीमाशंकर देवस्थान मंदिर ट्रस्ट, भीमाशंकर
4 ) खंडोबा मंदिर कडेपठार, जेजुरी
5) श्री म्हस्कोबा देवस्थान मंदिर ट्रस्ट, वीर
6) भूलेश्वर महादेव मंदिर, माळशिरस
7) श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर, देवस्थान बोपगाव
8 ) श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, नसरापूर, भोर
9) श्री तुकाई माता देवस्थान व सेवा ट्रस्ट, हडपसर
10) श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, वडज तालुका – जुन्नर, पुणे

11 ) भैरवनाथ मंदिर देवस्थान, सासवड
12 ) सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर
13) सोरतापेश्वर महादेव मंदिर, सोरतापवाडी
14) मारुती मंदिर, सोरतापवाडी
15) म्हस्कोबा मंदिर, कोडीत
16) अंबामाता मंदिर, वाघळवाडी
17) मल्लिकार्जुन महादेव मंदिर, मुरुम
18) गणपती मंदिर, लोणकर मळा
19) श्री पांडुरंग देवस्थान, मंचर
20) श्री राधाकृष्ण मंदिर, गोशाळा, हडपसर

21) जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट (श्रीराम मंदिर),
काळबोराट नरार, हडपसर
22) श्री स्वामी समर्थ मठ, काळपडळ, हडपसर
23) नायडू गगवानी मंदिर, देहू रोड
24) श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्था, ज्ञानेश्वर
महाराजांनी बेद बोलविलेले रेडा समाधी मंदिर, आळे
25) शंभू महादेव मंदिर, हिवरे
26) म्हस्कोबा मंदिर, हिवरे
27) श्रीनाथ म्हसोबा मंदिर, वडगाव बु. पुणे
28) श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, रांजणी, तालुका आंबेगाव, पुणे
29) तपनेश्वर सेवा मंडळ ट्रस्ट, मंचर
30) श्री. गणेश मंदिर, तुकाई नगर प्रतिष्ठान, पुणे

31) दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गावडेवाडी, तालुका आंबेगाव, पुणे
32) वेळेश्वर देवस्थान संस्था, कुरवंडी, तालुका – आंबेगाव, पुणे
33) यमाई देवी संस्थान, कवठे यमाई तालुका – शिरूर, पुणे
34) श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबेग तालुका आंबेगाव, पुणे
35) स्वयंभू मोरया गणपती देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव, पुणे
36) कमलजा देवी मंदिर संस्था, शेवाळवाडी, मंचर, तालुका आंबेगाव, पुणे
37) श्री दत्त मंदिर देवस्थान संस्था, चिंचोडी देशपांडे (लांडेवाडी) तालुका आंबेगाव, पुणे
38) श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान, घोडेगाव तालुका – आंबेगाव, पुणे
39) श्रीराम मंदिर देवस्थान संस्था, चास तालुका आंबेगाव, पुणे
40) श्री हनुमान मंदिर देवस्थान संस्था, मांदळेवाडी (लोणी) तालुका आंबेगाव, पुणे

41) श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, वडगाव पीर तालुका आवेगाव पुणे
42) श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गाव साकोरे तालुका आंबेगाव पुणे
43) श्री महादेव मंदिर देवस्थान संस्था, लोणी तालुका आंबेगाव, पुणे
44) श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, लोणी तालुका आंबेगाव, पुणे
45) श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, खडकवाडी तालुका – आंबेगाव पुणे
46) श्री गणेश देवस्थान संस्था, वाळुंजनगर (लोणी) तालुका आंबेगाव, पुणे
47) श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट गाव धामणी, तालुका – आंबेगाव, पुणे
48) श्री वाकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट, पेठ तालुका – आंबेगाव, पुणे
49) भार्गव कुदळे पाटील श्रीराम मंदिर, नन्हे
50) अंबा माता मंदिर, वडगाव (बु)

51) श्रीराम मंदिर ट्रस्ट, हडपसर
52) श्री मारुती मंदिर महादेववाडी, हडपसर
53) श्री विठ्ठल मंदिर महादेववाडी, हडपसर
54) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, काळे बोराटे नगर
55) श्री स्वामी मंदिर देवस्थान, हडपसर
56) धनेश्वर मंदिर, तानाजी नगर, चिंचवड
57) श्री गजानन महाराज मंदिर, तळेगांव
58) श्री राम मंदिर, शितलादेवी, देहू रोड
59) श्री महालक्ष्मी मंदिर, केशव नगर, वडगाव मावळ
60) कडजाई माता मंदिर, इंदोरी

61) संत सावतामाळी विठ्ठल मंदिर, तळेगांव दाभाडे
62) केदारेश्वर महादेव मंदिर, तळेगांव दाभाडे
63) श्रीराम मंदिर, आळंदी
64) कावड महादेव मंदिर, सासवड
65) बटेश्वर महादेव मंदिर, सासवड
66) संगमेश्वर महादेव मंदिर, सासवड
67) दत्त मंदिर, नारायणगाव
68) दत्त मंदिर, दत्तघाट, नीरा
69) हनुमान मंदिर, नीरा
70) महादेव मंदिर, नीराघाट, नीरा
71 ) कातोबा मंदिर देवस्थान, दिवेगाव

अधिक वाचा –
– ‘सलोनी मोतीबने’ ठरल्या सौ-भाग्यवती मावळ 2024; कामशेत येथे 40 हजार महिलांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम
– राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा
– ‘मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!’ मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली


Previous Post

लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News

Next Post

वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-katavi-sunil-shelke

वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.