व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘एकल भगिनी सक्षमीकरण’ अभियान, मावळ राष्ट्रवादी देणार महिलांना आधार । Maval Taluka NCP

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या माध्यमातून 'एकल भगिनी (विधवा) सक्षमीकरण अभियान' राबविण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 12, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-taluka-ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या माध्यमातून ‘एकल भगिनी (विधवा) सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत मावळ तालुक्यातील प्रत्येक गावामधील एका विधवा महिलेस स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 21 ते 50 वयोगटातील विधवा महिला यासाठी लाभार्थी म्हणून पात्र असतील. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

प्रत्येक गावनिहाय विधवा महिलांची माहिती घेऊन स्थानिक पदाधिकारी व राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे एका महिलेचे नाव काढण्यात येईल आणि या चिठ्ठीद्वारे नाव आलेल्या महिलेस शिलाई मशीन देण्यात येणार आहे,अशी माहिती तालुकाध्यक्षा दिपाली गराडे यांनी दिली. ( Ekal Bhagini Empowerment Campaign through Maval Taluka NCP Mahila Congress )

पतीचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांश महिलांच्या वाटेला हालअपेष्टाच येतात. त्यामध्ये काही महिलांच्या घरची स्थिती चांगली असेल तर त्यांना आर्थिक अडचणी जास्त जाणवत नाहीत. परंतू सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले, तर त्या महिलेवर आभाळ कोसळते. घराचा आणि मुलांचा सांभाळ करणे देखील कठीण होऊन जाते. अशा विधवा भगिनींच्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणीतरी शाश्वत आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास देखील मिळतो. त्यामुळेच विधवा महिलांसाठी राष्ट्रवादीने चांगला उपक्रम हाती घेतला असुन या अभियानाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.

“विधवा महिलांच्या प्रश्नाबाबत केवळ सहानुभूती न ठेवता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. या महिलांना आधार मिळावा, स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्न सुरु व्हावे यासाठी राष्ट्रवादीचा हा उपक्रम आशादायक ठरेल.” – दिपाली गराडे (तालुकाध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस)

अधिक वाचा –
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha
– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू
– मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार


Previous Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News

Next Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-kharedi-vikri-sangh

मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी 'यांची' निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.