व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द ; महाराष्ट्रातील ‘या’ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र
ECI

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द केली आहे.

Novel NIBR Ads

सध्या देशात ६ राष्ट्रीय पक्ष, ६७ प्रादेशिक पक्ष आणि २८५४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेले राजकीय पक्ष (RUPPs) आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणी करताना पक्षांनी नाव, पत्ता, पदाधिकारी यांची माहिती द्यावी लागते तसेच सहा वर्षे सलग निवडणूक न लढवल्यास नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाकडे आहे.

जून २०२५ मध्ये आयोगाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ३४५ RUPPs ची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. तपासणीदरम्यान संबंधित पक्षांना नोटिसा देऊन प्रत्यक्ष सुनावणीची संधी देण्यात आली.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही. उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत. परिणामी, आता देशातील RUPPsची संख्या २८५४ वरून २५२० वर आली आहे.

या पक्षांना आता लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम २९ब आणि २९क तसेच आयकर कायदा, १९६१ व निवडणूक चिन्ह आदेश, १९६८ अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच या पक्षांना आयोगाच्या आदेशाविरोधात ३० दिवसांच्या आत अपील करता येईल.

भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील (१) अवामी विकास पार्टी, (२) बहुजन रयत पार्टी, (३) भारतीय संग्राम परिषद, (४) इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, (५) नव भारत डेमोक्रॅटिक पार्टी, (६) नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, (७) पिपल्स गार्डियन, (८) दि लोक पार्टी ऑफ इंडिया आणि (९) युवा शक्ती संघटना या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

तपशीलवार यादीसाठी https://www.eci.gov.in/list-of-political-parties या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरात उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणून नव्याने कचरा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करा । Vadgaon Maval

Next Post

शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
students should be trained on lines of NCC from first grade said School Education Minister Dadaji Bhuse

शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.