Entry ban for heavy vehicles in Lonavala : देशभरातील पर्यटकांसाठी लोणावळा हे शहर पावसाळी पर्यटनासाठी क्रमांक 1 चे पसंतीचे शहर आहे. परंतू लोणावळा शहर आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसतो आहे. त्यातही लोणावळा शहरातून जाणारा जुना मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहन चालकांकडून बळजबरीने वाहने घुसवली जातात, त्याचाही फटका बसून वाहतूक कोंडी होते. त्यावर आता प्रशासनाने कायम स्वरूपी तोडगा काढला असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग जुना – 4 येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड – अवजड वाहतूक कायस्वरूपी बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरातून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जातो. त्यात लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार तसेच इतर सार्वृजनिक सलग सुट्या असतात, तेव्हा पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात दाखल होतात. पुणे-मुंबई व मुंबई- पुणे या मार्गावर जड-अनजड वाहनांना एक्सप्रेस हायवे रोड उपलब्ध असतानाही ही जड- अवजड वाहने शहरातून ये- जा करतात, त्यामुळे लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची आणि अपघाताची समस्या निर्माण होत असते. त्यासाठी लोणावळा शहरात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग – ४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 वा. ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहतुक कायम स्वरुपी बंद ठेऊन ही वाहतुक पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरुन सुरु ठेवणेत यावी, अशा प्रकारची अधिसुचना करण्याची विनंती पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी प्रस्तावाद्वारे केली होती. ( Entry ban for heavy vehicles in Lonavala city Orders by Collectors )
याप्रस्तावाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी लोणावळा शहरातील जड-अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजनाम्हणून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग -४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरप्यान कायम स्वरुपी सकाळी 6 वा. ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान जड- अवजड वाहनांची वाहतुक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे वरुन सुरु ठेवता येणार आहे.
अधिक वाचा –
– ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील
– ‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार
– मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade