भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख तथा मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे PM किसान सन्मान निधी योजनेचे मोफत अर्ज भरणे आणि ekyc करण्याची सुविधा सुरू केलेली आहे. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी याच लाभ घेऊन आपले अर्ज भरून घेण्याचे आवाहन रविंद्र भेगडे यांनी केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत होता, परंतु ekyc बाकी असल्याने पुढील लाभ बंद झाला आहे, अशा शेतकऱ्यांची ekyc करण्याचे काम देखील कार्यालयातून मोफत केले जात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. ( facility to fill PM Kisan Samman Nidhi Yojana application form and E-KYC for farmers at BJP party office in Vadgaon )
पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे PM किसान योजनेचा फॉर्म भरून झालेल्या शेतकऱ्यांना माजी उपसभापती शांताराम कदम, अंदर मावळ भाजपा अध्यक्ष गणेश कल्हाटकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, चांदखेड महागाव गट भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, उद्योजक संदीप पवार, सरपंच खंडू येवले, अमोल धिडेयांच्या हस्ते अर्जाची पोहोच पावती देण्यात आली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती
– वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । तब्बल 300 वृक्षांची लागवड… Khopoli News
– लोणावळा शहरात रक्तदान शिबिर, 253 बाटल्या रक्त संकलित । Lonavala News