Dainik Maval News : ओला चारा चारण्यासाठी जनावरांना डोंगरावर घेऊन गेले असता आपल्याच जनावराने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या घटनेत कुसगाव खुर्द येथील पांडुरंग नामदेव लालगुडे (वय ५९) यांचा मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसायिक पांडुरंग लालगुडे हे रविवारी कुसगाव खुर्द येथील डोंगरांवर आपल्या लहान-मोठ्या म्हशी आणि एका रेड्याला चारण्यासाठी घेऊन गेले होते. सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे जनावरे घेऊन डोंगरावर गेले होते. त्यावेळी रेड्याने लालगुडे यांच्यावर हल्ला करत छाती आणि डोक्यावर गंभीर जखमा केल्या. तिथे जवळपास मदतीसाठी कुणीही नसल्याने कित्येक तास एकाजागी पडल्याने उपचाराअभागी लालगुडे यांचा मृत्यू झाला. ( Farmer dies in buffalo attack incident at Kusgaon in Maval taluka )
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान लहानपणापासून ज्या जनावराला पोटच्या मुलाबाळांप्रमाणे संभाळला त्यानेच असा करून घरातील कारभाऱ्याला मारल्याने घरातील कुटुंबीयांना शोक अनावर झाला आहे.
अधिक वाचा –
– देहूतील विकासकामांसाठी 15 कोटी देणार, नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंचे आश्वासन । MLA Sunil Shelke
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News
– संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक