व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूतील विकासकामांसाठी 15 कोटी देणार, नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंचे आश्वासन । MLA Sunil Shelke

देहू नगरपंचायत कार्यालयात रविवारी (दि. 25 ऑगस्ट) मुख्याधिकारी, सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 27, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगरपंचायत कार्यालयात रविवारी (दि. 25 ऑगस्ट) मुख्याधिकारी, सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. देहू नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये याकरिता नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी सांगितले. तसेच, देहूतील विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

यावेळी देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, ठेकेदार, नगरपंचायतीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या अडचणीचा विचार करता गणेशोत्सवापूर्वीच सुरू असलेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत. पदपथावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार कर वसूल करू नये. कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मंजूर आराखड्यानुसार काम केले असेल तरच भोगवटा प्रमाणपत्र (पुर्णत्वाचा दाखला) द्यावे. अन्यथा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा सक्त सुचना आमदार सुनील शेळके यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. ( MLA Sunil Shelke promises to give 15 crores for development works in Dehugaon )

बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राला अखंड विद्यूत पुरवठा होत नसल्याने गावात सध्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून तातडीने तळवडे परिसरातील एक्सप्रेस फिडर वरून ओव्हर हेड विद्यूत पुरवठा तत्काळ घ्यावा. यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा. यासाठी दोन ते तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार शेळके यांनी दिले.

यावेळी काही ठिकाणच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी बैठकीत आल्या. त्यात पेव्हींग ब्लॉक बदलून मिळावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याबाबतीत संबधीत ठेकेदारांनी पेव्हींग ब्लॉक बदलून द्यावेत, ते कॉंक्रीट रस्त्याच्या कडेला वापरावे, कामाच्या दर्जात कोठेही तडजोड करू नये, अशा सुचना आमदार शेळके यांनी दिल्या. यासह गल्लीत जाणारे मुख्य रस्ते प्राधान्याने करावेत, मुख्य रस्ते 8 इंच आणि अंतर्गत रस्ते 6 इंच जाडीचे कॉंक्रीटचे करावेत, अशीही ताकीद दिली.

अधिक वाचा –
– मावळची बालगायिका अवनी परांजपे रियालिटी शोच्या सेमी फायनलमध्ये दाखल; फायनल जिंकून सुपरस्टार होण्याची आशा
– महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News


Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News

Next Post

मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, राज्य सरकारचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
shinde fadanvis pawar

मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, राज्य सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
Missing Link project will be a boon for Maval Traffic congestion in Lonavala Khandala area will be reduced

मिसिंग लिंक प्रकल्प मावळसाठी ठरणार वरदान ! लोणावळा – खंडाळा भागातील वाहतूक कोंडी कमी होणार

May 1, 2026
Missing Link project on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज ‘महाराष्ट्र दिनी’ होणार लोकार्पण

May 1, 2026
Voter list mapping verification work underway under SIR program in Vadgaon Nagar Panchayat limits

वडगाव नगरपंचायत हद्दीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी मॅपिंग व पडताळणीचे काम सुरू – नागरिकांना आवाहन

April 30, 2026
Basic training workshop for newly elected Zilla Parishad members concluded

ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला नवी चालना

April 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.