भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा नाहक बळी गेला आहे. तळेगाव-चाकण रोडवर इंदोरी गावात ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार पोलिसांनी टेम्पो (क्र. एमएच 14 डीएम 9513) चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( fatal accident on talegaon chakan road bike rider dies in collision with tempo )
सुरेश दाभाडे (वय 29, रा. इंदोरी, ता. मावळ) असे सदर अपघातात मृत पावलेल्या तरुण दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, अपघातात गीताराम कल्याण सोनवणे (वय 35, रा. इंदोरी, ता. मावळ) हे जखमी झाले आहेत. तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरी गावात 25 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला.
याप्रकरणी अरुण दाभाडे (वय 30, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. ( fatal accident on talegaon chakan road bike rider dies in collision with tempo )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अत्यंत धक्कादायक बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
– अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच..! काँग्रेसच्या हायकमांडने ‘या’ नेत्यावर सोपवली जबाबदारी
– लोणावळा स्टेशनसह देशातील तब्बल 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट । Amrit Bharat Station Scheme