पुणे जिल्ह्यातील ( Pune District ) सर्व तालुक्यांमध्ये बुधवार ( 7 डिसेंबर) रोजी फेरफार अदालतीचे ( Ferfar Adalat ) आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून नोंदी निर्गत करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ( Ferfar Adalat In All Taluka At Pune District )
‘सात-बारा’चे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाराजस्व अभियानांतर्गत 7-12 अर्थात 7 डिसेंबर या तारखेचा योग साधून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून #पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर ७ डिसेंबर २०२२ रोजी फेरफार अदालतीचे आयोजन.संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन.
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 5, 2022
नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून फेरफार अदालत आयोजित करण्यात येते. यावेळी फेरफार अदालतीशिवाय सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करणे आदी कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामशेतमध्ये रक्तदान शिबीर
– भाजपाच्या आंदोलनाला यश; जुलै 2023 पर्यंत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होणार
– खासदार शरद पवार आणि बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड येथे ‘राष्ट्रवादी चषक-2022’ क्रिकेट स्पर्धा