नोव्हेंबर 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी २ आणि ३ नोव्हेंबर रोजी खेड, ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी मंचर, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी जुन्नर, २० आणि २१ नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ आणि २८ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे. ( Firm license by pimpri chinchwad sub rto office gather in maval taluka November 2023 )
अधिक वाचा –
– आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन
– आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!
– पिंपरी-चिंचवड शहरात भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन; संपूर्ण पुणे विभागातून महिला होणार सहभागी