रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या राबवलेल्या गणेशमूर्तीदान संकल्पनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक 23 आणि 25 सप्टेंबर रोजी अर्थात गणपती विसर्जनाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी नगरपरिषदेत संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत श्रीगणेश मूर्तींचे संकलन केले गेले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात लवकर विघटन होत नाही. तसेच निर्माल्य नदीत सोडल्यास प्रदूषण होते. हे लक्षात घेता रोटरी आणि इनर व्हील क्लब यांनी संयुक्तरित्या हा स्तुत्य उपक्रम राबवला होता. तत्पुर्वी मूर्तीदान करण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशमूर्ती दान केल्या. दोन्ही दिवसात मिळून साडेतीनशेहून अधिक मुर्तींचे संकलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- नगरपरिषद केंद्रावर एकूण 350 श्रींच्या मूर्तींचे संकलन झाले. लोकांनी बाप्पांना वाजतगाजत आणून, मनोभावे आरती करून जड अंतःकरणाने निरोप दिला. श्रींची मूर्ती दान करणाऱ्या भक्तांना इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यांच्या हस्ते पर्यावरणाचे रक्षण केल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. ही सन्मानचिन्हे श्री प्रसाद आणि कल्याणी मुंगी, श्री उद्धव आणि अर्चना चितळे यांनी उपलब्ध केली होती. दोन्ही दिवसांच्या उपक्रमात चांदनी गांधी, ज्योती जाधव, संगीता शेडे, संगीता जाधव, जयश्री दाभाडे, शलाका वालिया, भावना चव्हाण, कल्पना जाधव, नीता देशपांडे, अर्चना चितळे, कल्याणी मुंगी, तसेच क्लबच्या अध्यक्षा आणि सचिव निशा पवार यांनी हातभार लावला.
ह्या संकलित केलेल्या गणेशमूर्ती पुढील वर्षी नवीन रंगकाम करून उजाळा देण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषद दर वर्षीप्रमाणे निर्माल्यापासून खत निर्मिती करणार आहे. निर्माल्यातील दोरे आणि कापूस पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या कामी येणार आहे. ( Ganesh Idol and Nirmalya Collection through Rotary Club Inner Wheel Club and Municipal Council Of Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड जाहीर
– ‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश