(पेण – देवा पेरवी) “गणपती बाप्पा आम्हाला पाव” असा धावा करीत पेणच्या श्री गणेश मूर्तीकारकांनी आपल्या विविध मागण्या तसेच पीओपी वरील बंदी कायमची उठवण्याची मुख्य मागणी घेऊन शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची नुकताच भेट घेतली. सदर भेट ही शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. ( Ganesha Idol Manufacturers Of Pen Met Alibag MLA Mahendra Dalvi To Lift POP Ban )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या काही वर्षांपासून पेण च्या गणेश मूर्तीकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेण शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र या व्यवसायावर गदा आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीकार मालकांसह कामगार चिंतीत झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार महेंद्र दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आणि गणेश मूर्तीकारांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चादरम्यान आमदार महेंद्र दळवी, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख राजा केणी उपस्थित होते. लवकरच मूर्तीकारकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांच्यासह इतर शिष्टमंडळा सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणणार असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा – कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 32 हजार 559 नामनिर्देशन पत्रे दाखल
यावेळी उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील, श्री गणेश मुर्तिकार संघटनेचे हमरापूर विभाग अध्यक्ष किरण दाभाडे, हमरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश दाभाडे, कळवे ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, निकिता पाटील, राजन पाटील, संजय पाटील, विनोद नाईक, सचिन गोलिमडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात 60 हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली, राज्यात अव्वल कामगिरी; मावळ तालुका जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! राज्याचे नवे रेती धोरण जाहीर, आता नागरिकांना स्वस्त दराने मिळणार रेती, वाचा सविस्तर