व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी गिरीश दापकेकर यांची नियुक्ती ; विजयकुमार सरनाईक यांची बदली

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे शासन आदेश जारी केले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 4, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची आज ( दि. 4 नोव्हेंबर ) सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली झाली आहे. विजयकुमार सरनाईक यांची पदोन्नतीने झाली असून त्यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या मुख्याधिकारी पदी गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबतचे शासन आदेश जारी केले आहेत. शासनाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या सहीचे पत्रक समोर आले आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान सीईओ विजयकुमार सरनाईक यांची पदोन्नती होऊन बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दापकेकर यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश पत्रात नमूद आहे. तर विजयकुमार सरनाईक यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तालयात उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विजयकुमार सरनाईक यांनी तळेगावकर नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. नुकतीच त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वास जाऊन तिचे लोकार्पण झाले होते.

गिरीश दापकेकर यांनी यापूर्वी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच पुणे महापालिकेच्या औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून कारभार पाहिला आहे. घनकचरा व्यवस्थापनच्या राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही दापकेकर यांनी काम पहिले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– आचारसंहिता लागू, नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी – वाचा सविस्तर
– अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण


dainik maval jahirat

Previous Post

इंदोरी येथे ‘पायी पालखी सोहळा २०२५’ निमित्त भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन । Indori Kirtan Sohala

Next Post

फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, लाखो नागरिकांना होणार फायदा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
com maharashtra devendra fadanvis

फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द, लाखो नागरिकांना होणार फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.