व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गुडन्यूज ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग होणार दहा पदरी, ‘एमएसआरडीसी’कडून प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई - पुणे द्रुतगती मार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून या मार्गावरून दररोज ६५ हजारांहून अधिक वाहने धावतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 2, 2025
in पुणे, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Borghat area on Mumbai-Pune National Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठऐवजी दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसी पुणे विभाग यासंबंधी प्रस्ताव तयार करीत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गाचे दहा पदरीकरण झाल्यास मुंबई-पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होणार आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून या मार्गावरून दररोज ६५ हजारांहून अधिक वाहने धावतात. सध्याला वाहतुकीस हा महामार्ग अपुरा पडू लागला असून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन एमएसआरडीसीने वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सहा पदरी महामार्गाचे रूपांतर आठ पदरी महामार्गात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अगोदर दोन्ही बाजूने एक-एक मार्गिका वाढविण्यात येणार होती, त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. मात्र या महामार्गाचे महत्त्व आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीने या महामार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जूनमध्ये राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार होता. मात्र त्यास काहीसा विलंब झाला असला तरी आता लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

सतरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
मार्ग आठ पदरीकरणासाठी ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता. पण आता दहा पदरीकरणासाठी अधिक जमीन संपादित करावी लागणार असून बोगद्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे या दहापदरीकरणासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च येईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र आता खर्च १७ हजार कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


Previous Post

पुणे जिल्ह्यात कृत्रिम वाळू युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

Next Post

मावळमध्ये महायुती होणार नाहीच !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
There will be no Mahayuti in Maval Taluka After NCP BJP announces candidates

मावळमध्ये महायुती होणार नाहीच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.