व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग । Maval News

मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. पवन मावळ भागात जवळपास सर्वच गावात आज आधुनिक शेती पद्धतीने शेतकरी शेती करत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Maval Taluka Paddy Cultivation by Four Sutra Method

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. पवन मावळ भागात जवळपास सर्वच गावात आज आधुनिक शेती पद्धतीने शेतकरी शेती करत आहेत. बऱ्याच दिवसा पासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. परंतु आता पाऊस हळुहळु सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड चालू केल्या आहेत. मौजे मळवंडी ठुले गावातील प्रगतशील शेतकरी किसन ठुले यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषिसहाय्यक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्यावर्षी जून महिन्यात रोपवाटिकाना पोषक असा पाऊस पडला होता. परंतु लागवडी साठी पोषक पाऊस नव्हता. त्यामुळे लागवडी सुरु नव्हत्या परंतु आता चांगला पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड वारू, शिळींब, मळवंडी ठुले, येळसे, महागाव, काले, मोरवे, चावसर, केवरे, प्रभाचीवाडी, करुंज, कडधे, सावंतवाडी, मालेवाडी, ब्रामणोली, शिवली, कोथुरणे इ. परिसरात चालू केल्या आहेत.

लागवडी नंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे लागवडी नंतर दोन ते तीन दिवसात लावनार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. मजुराचा तुटवडा ह्यावर्षी ही जाणवू लागला आहे. ह्यांमुळे लोक आधुनिक लागवडीकडे वळले आहेत ह्या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री पध्दतीने लागवड करत आहेत. शेतकरी भातलावणी करताना दोन ते तीनच भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. पवनमावळ भागात ह्यावर्षी चारसूत्री पद्धतीला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे व त्याच बरोबर एस. आर. टी., यंत्राने, पेर भात, लागवड पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवड केली असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी व मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.

‘ह्यावर्षी पवन मावळ भागातील शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीला प्राधान्य दिले आहे. लागवडी नंतर शेतकरयांनी युरिया ब्रिकेट गोळी खत द्यावे. तसेच भात पिकाचा विमा काढून घ्यावा. म्हणजे भातपिकाला सुरक्षा कवच असल्याने फायदा होईल,’ मंडळ कृषि अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News
– पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नौकाविहार नियमावली ; बोट क्लब मालकांसाठी अनेक नियम-अटी, वाचा सविस्तर । Pune News


Previous Post

मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News

Next Post

ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
suicide by shooting himself

ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Gram Panchayat has done development works worth Rs 25 crores in last five years said Sarpanch Rupesh Gaikwad

सरत्या पंचवार्षिक काळात २५ कोटींची विकासकामे कामशेत ग्रामपंचायतीने केली – सरपंच रुपेश गायकवाड

February 20, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील बुलेटराजांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई ; 15 दुचाकींचे सायलेन्सर जप्त

February 20, 2026
Free travel service for 2369 SSC students from 71 villages in maval on initiative of MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यातील ७१ गावांतील दहावीच्या २,३६९ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा

February 20, 2026
Demand to start CCTV cameras in closed areas of Vadgaon city Statement to administration

Vadgaon Maval : वडगाव शहरातील बंदावस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी ; प्रशासनाला निवेदन

February 18, 2026
Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.