व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा - वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 16, 2025
in महाराष्ट्र
Health Minister directs to organize special health camps for journalists twice a year

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.

मध्य प्रदेश मधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य समन्वयक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पत्रकार यांची समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या समितीने राज्य शासनाच्या आरोग्य योजना, केंद्राच्या आरोग्य योजना यांचाही अभ्यास करून सविस्तर सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये ‘सीएसआर’चाही विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कशा प्रकारे कॅशलेस आरोग्य सेवा देता येतील याचा त्यात प्रामुख्याने विचार व्हावा, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेताना महिला पत्रकारांसाठीही विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांनाही लागू आहे. त्याच्या कार्डचे पत्रकारांना वाटप व्हावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पत्रकारांनाही लागू असणाऱ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारांची भूमिका मांडली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा


dainik maval jahirat

Previous Post

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर, तळेगावमधील खेळाडूने केली होती तक्रार ; संबंधित शाळा व विद्यार्थ्यावर कारवाई

Next Post

बिबट प्रभावित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा ; वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
leopard Image

बिबट प्रभावित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा ; वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.