व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बिबट प्रभावित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा ; वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 16, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र
leopard Image

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मानव – बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.

विधान भवन, पुणे त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार अमोल कोल्हे, सर्वश्री आमदार दिलीप वळसे पाटील, बापू पठारे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, वनसंरक्षक आशिष ठाकरे, उप वनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कृषी,महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांत २१ मृत्यू, ५२ जखमी, १८ हजार जनावरांचा बळी
मागील पाच वर्षांत या भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे २१ नागरिकांचा मृत्यू, ५२ जखमी तर सुमारे १८ हजार पाळीव जनावरांचा बळी गेला आहे. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मानव-बिबट संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत नैसर्गिक आपत्तीचे रूप घेत आहे, असे बैठकीत नमूद करण्यात आले.

दिवसा वीजपुरवठा व तत्काळ उपाययोजना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड, दौंड तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले व पारनेर या तालुक्यांमध्ये दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या असून ३१ ऑक्टोबर २०२५ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी प्रस्ताव वनविभागाने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा आणि त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पुणे यांना देण्यात आल्या.

बिबट नसबंदी आणि स्थलांतरावर भर
बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदीबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या. तसेच बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थलांतर करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

पिंजरे खरेदीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर
बिबट पकडण्यासाठी आवश्यक पिंजरे खरेदी करण्यासाठी तातडीने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मदतीने संवेदनशील भागांमध्ये पकड मोहिमेला गती मिळेल.

शेतकऱ्यांना १००% अनुदानित सौर कुंपण देण्याचा निर्णय
संवेदनशील गावांतील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानित सौर कुंपण पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी मंत्री (वने) आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

मेंढपाळांसाठी तंबू, सोलार लाईट पुरवठा
संघर्षप्रवण भागातील मेंढपाळांना तंबू, सोलार लाईट आदी साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेंढपाळांना संरक्षण व प्रकाश व्यवस्था उपलब्ध होईल.

AI आधारित ५० नवीन युनिट्स
बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आणखी ५० युनिट्स वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे बिबट हालचालींचे निरीक्षण अधिक कार्यक्षमतेने करता येईल.

शिरुर येथे रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याची सकारात्मक चर्चा
शिरुर येथे २०० बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटर सुरू करण्याबाबत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच ग्रामस्तरावर जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. मानव – बिबट् संघर्ष संघर्ष संपविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून वन खात्यातून सेवा निवृत्त झालेले अनुभवी अधिकारी अशोक खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा


Previous Post

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

Next Post

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit Pawar inaugurates district-level Chief Minister Relief Fund Cell Citizens of Pune district will benefit

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet Accident Car catches fire on flyover on old Pune-Mumbai highway One dies of burns

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

May 5, 2026
PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडीए’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 5, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.