व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हॉटेल, चायनीज सेंटरमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची आता खैर नाही! वडगाव पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Illegal-sale-of-alcohol

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिवणे आणि मळवंडी ढोरे परिसरातील हॉटेल चालक हे त्यांच्या हॉटेलमध्ये अवैधपणे दारूविक्री करत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सत्यसाई कार्तिक यांनी बुधवारी, दिनांक 27 डिसेंबर रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. त्यानंतर पथकाने मळवंडी ढोरे (ता. मावळ) येथील 1) हॉटेल जगदंब व मौजे शिवणे येथील 2) हॉटेल पाटीलवाडा मटण खानावळ व 3) हॉटेल कैलास चायनीज अशा तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पथकाने छापे टाकले. ( Illegal sale of alcohol Vadgaon Maval Police action on Hotel Chinese Center )

ह्या टाकलेल्या छाप्यात नमूद हॉटेलचे चालक यांच्या ताब्यातून एकूण 19,815 रूपये किमतीचा अवैध, विनापरवाना विक्री करण्यासाठी ठेवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस स्टेशन इथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या विविध कलमान्वये 3 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोना रईस मुलानी व वडगाव मावळ स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा
– धाडसाचं कौतूक, धैर्याला सॅल्यूट.! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सर्पमित्रांकडून जाळीत अडकलेल्या विषारी नागाला जीवदान
– इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक; इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – मंत्री दीपक केसरकर


Previous Post

मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.