व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून विभागातील अवैध धंद्यांवर आणी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 19, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
IPS-Satyasai-Karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा (Lonavala) उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक ( IPS Satyasai Karthik ) यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून विभागातील अवैध धंद्यांवर आणी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वडगाव मावळ ( Vadgaon Maval) पोलिस (Police) स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सोमवारी (दिनांक 18 मार्च) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले. तेव्हा पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव शहरातीस एका भाडे तत्वावरील पत्र्याच्या शेडमध्ये मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी (वय 25 वर्ष) आणि अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे त्यांच्या ताब्यात महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2 लाख 52 हजार एवढ्या किमतींचा गुटखा बाळगताना मिळून आले. ( IPS Satyasai Karthik Team Raided at Vadgaon Maval Confiscated Gutkha Worth 2.5 Lakhs Pune Crime )

आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी (वय अंदाजे 30 वर्ष) (सध्या फरार) याच्या मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती


Previous Post

मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway

Next Post

लोकसभा निवडणूका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचे संचलन । Lonavala Police Route March

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Police-Route-March

लोकसभा निवडणूका आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचे संचलन । Lonavala Police Route March

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.