व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

पर्यटननगरी लोणावळा शहरापासून जवळ असलेला, राजमाची मार्गावरील प्रसिद्ध कातळधार धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Katdhar waterfall on Lonavala-Rajmachi route is closed for tourists

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरापासून जवळ असलेला, राजमाची मार्गावरील प्रसिद्ध कातळधार धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. वनखात्याने त्यासंदर्भात आदेश पारित केले आहेत.

राजमाची किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या कातळधार धबधब्याकडे जाणारी पायवाट निसरडी आणि धोकादायक झालेली असल्याने, तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी सैल झालेल्या असल्याने राजमाची ग्रामस्थांनी हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करावा, अशी मागणी पोलीस आणि वन खात्याकडे केली होती.

त्याअनुषंगाने कातळधार धबधब्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून तसे फलक वनखात्याकडून जागोजागी लावण्यात आले आहे. याशिवाय राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑफरोडिंग करणाऱ्या वाहनांना देखील बंदी घालण्यात आल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी दिली.

दरम्यान, धबधब्याचा पाण्यात भिजण्याची मजा लुटण्यासाठी राजमाचीकडे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी फणसराई भागात असलेले ५ ते ६ धबधबे पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले असून त्याठिकाणी सुरक्षित पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन वनखात्याकडून करण्यात आले आहे.

एखादी दुर्घटना घडल्यावर सर्वात आधी प्रशासनाला जबाबदार धरले जाते. मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक अतिउत्साहीपणा दाखवतात व त्यानंतर कुंडमळा सारख्या दुर्घटना घडतात, हेही तितकेच खरे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत सुरक्षित पर्यटन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

किरकोळ भांडणातून मित्रांनीच कारमध्ये केली मित्राची हत्या ; दुधीवरे परिसरात आढळलेल्या मृतदेहाच्या खूनाचा अखेर उलगडा

Next Post

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.