मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) कोंडिवडे ( Kondhiwade ) येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची वडगाव पोलिसांनी ( Vadgaon Maval Police ) उत्तराखंडमधून ( Uttarakhand ) सुखरूप सुटका केली आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडिवडे येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलगीचे अपहरण झाले होते. तिच्या वडिलांनी फिर्यादीत ऋषिकेश शरद गायकवाड याने मुलीला फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त केला होता. ( Kidnapped girl from Kondivade rescued from Uttarakhand state )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी नसल्याचे दिसून आले. लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी मोबाईल फोन ट्रॅक केला असता पीडित मुलगी ही संशयित आरोपीबरोबर असल्याचे दिसून आले. आरोपी तिला लोणावळाहून ठाणे आणि तिथून पुढे उत्तराखंड येथे घेऊन गेला असल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिस निरीक्षक भोसले यांनी तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सचिन काळे, निर्मला उप्पू, शशिकांत खोपडे यांचे पथक उत्तराखंडमध्ये रवाना केले. हरिद्वार येथील पोलिस पथकाने वडगाव मावळ पोलिस पथकांस बरोबर घेऊन मोबाईल टॉवर लोकेशनवरून मुलीचे आणि आरोपीचे शोधकार्य चालू केले असता एका लॉजमध्ये दोघे जण आढळून आले. पोलिसांनी मुलीला सुखरूप ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि दोघांना वडगाव मावळ येथे घेऊन आले.
हेही वाचा – स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना
सध्या अल्पवयीन बालिकांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत जागृत होऊन अल्पवयीन मुलांच्या मोबाईल फोन वापरावर देखरेख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
– खळबळजनक! वडगाव मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आत्म’हत्येचा प्रयत्न
– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल