जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर आज (शुक्रवार, दिनांक 12 मे) रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ( Kishor Aware Murder News )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.
किशोर आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काहीच वेळात त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनकरिता वायसीएम रुग्णालयात नेल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक वाचा –
– ‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी
– कडधेतील अल्पसंख्यांक समाजाच्या मागणीची आमदारांकडून दखल; कब्रस्थान संरक्षक भिंतीसाठी तत्काळ निधी, कामालाही सुरुवात